लोकसभा निवडणुक पार पडल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पहिल्यांदा बैठक घेतली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी-एससीपी आणि शिवसेना (यूबीटी)चे प्रमुख नेते सहभागी झाले होते.
दरम्यान बैठकीनंतर महाविकास आघाडीची परत्रकार परिषद झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना, पत्रकारांनी विचारले की, महाविकास आघाडीत नाराजी आहे का? कारण नाना पटोले म्हणतात की उद्धव ठाकरे माझा फोन उचलत नाहीत.
पत्रकारांच्या या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देत, "तो विषय आता संपला आहे," असे म्हटले. ते पुढे म्हाणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो मुद्दा होता. त्यानुसार कोकण पदवीधर मतदारसंघात आम्ही आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठींबा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडीला 30 जागी विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. याचबरोबर त्यांनी युट्युब, सोशल मीडिया आणि विविध संघटनांनी संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जनतेच्या समोर मांडला त्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले की, तुम्ही भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल काय सांगाल. यावर ठाकरे यांनी शेजारी बसलेल्या शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे हात करत, हे बरोबर असताना तुम्हाला खरे सांगू असे म्हटले. त्यावेळी तेथे एकच हशा पिकला.
राज्यात चार जागांवर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर केले, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. यासंदर्भात ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनही उचलला नाही, असेही पटोले म्हणाले होते.
निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर व्यतिरिक्त नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर विभागाच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जागा जिंकल्या.
यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा, शिवसेने उद्ध ठाकरे आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा, राष्ट्रवादी शरद पवार यांनी 8 जागा, शिवसेना एकनाथ शिंदे यांनी 7 जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघी एक जागा जिंकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.