नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशात एनडीएला पुन्हा एकदा काठावरचे बहुमत मिळाले. भाजपला एकहाती बहुमताच्या आकड्यापासून दूर ठेवण्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता.
यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा गेल्यावेळी पेक्षा निम्म्याने कमी झाल्या. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 31 जागा जिंकत महायुतीचा सुपडा साफ केला.
महाविकास आघाडीच्या या विजयमामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान होते.
दरम्यान या निवडणुका पार पडून नवे सरकार स्थापन झाले आहे. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्या सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या व्हिडिओमध्ये शरद पवार पुरंदर आणि इंदापूर दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेत असल्याचे दिसत आहे. याचबरोबर ते नागरिकांचे निवेदनेही स्वीकारताना दिसत आहेत.
यावेळी या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हरिवंंश राय बच्चन यांनी लिहिलेली "धनुष उठा, प्रहार कर तू सबसे पहला वार कर अग्नि सी धड़क-धड़क हिरण सी सजग - सजग सिंह सी दहाड़ कर शंख सी पुकार कर रुके ना तू, थके ना तू झुके ना तू, थमे ना तू" ही कवीता ऐकू येत आहे.
ही पोस्ट शेअर करताना राष्ट्रवादीच्या एक्स अकाउंंटवर लिहिले आहे की, "लोकशाहीच्या रिंगणात उतरून जनतेच्या हितासाठी ज्या योद्ध्याने राज्यकर्त्यांचा घाम काढला तोच योद्धा आपल्या विजयाच्या गुलालात न रमता पुन्हा रिंगणात उतरलाय. देशाच्या बळीराजावर ओढवलेल्या आस्मानी संकटाशी मुकाबला करायला, राज्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी दाखवायला."
व्हिडिओच्या शेवटी राजकीय आखाड्यानंतर आता "योद्ध्याची स्वारी बळीराजाच्या हक्कासाठी!!"
दरम्यान हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण ते त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मससह व्हाट्सअपला शेअर करत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी फुटल्यामुळे शरद पवारांना किती यश मिळेल अशी चर्चा सुरू होती. मात्र, निकालानंतर त्यांच्या कामगिरीने सर्वांनाच धक्का दिला. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर त्यांना विजय मिळवला. तर महाविकास आघाडीत काँग्रेसने 13 जागा, ठाकरे यांच्या शिवसेने 9 जागा आणि काँग्रेसला पाठींबा दिलेल्या अपक्षाने एक जागा जिंकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.