Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis two groups called meeting in mumbai today politics news  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

रोहित कणसे

Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस सराकरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन बडे नेते शरद पवार आणि अजित पवार आज आणने-सामने येणार आहेत.

दोन्ही नेत्यांकडून आज (ता.५ जुलै) मुंबईत बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणाकडे किती आमदार असणार हे स्पष्ट होणार आहे . त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं बॉस कोण याचा उलगडा आज होणार आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्या आमदार,पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यामध्ये तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता मुंबई पोलिस घेत आहेत. दरम्यान आज सकाळी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दोन्ही गटांकडून व्हीप जारी

दरम्यान आजच्या बैठकीसाठी दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला.

बैठक कुठे होणार?

शरद पवार यांच्या गटाची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होणार आहे. तर अजित पवार यांच्याकडून एमएडीला बैठक बोलावली आहे. अजित पवार गटाची बैठक सकाळी अकरा वाजता होणार आहे.तर शरद पवार यांची बैठक दुपारी एक वाजता होणार आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीत आज काय होणार

आजच्या बैठकीत पक्षाचे संविधान नेमकी काय आहे, त्यानुसार कोणाला कोणते अधिकार हे सांगण्यात येणार आहे. २००६ साली शरद पवार यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यावेळी पक्ष संविधानात बदल करण्यात आले आणि त्यानुसार सगळे अधिकार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना देण्यात आले आहेत.

कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल पटेल यांना कोणतीही नेमणूक करण्याचे, कारवाई करण्याचे अधिकार नाही हे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहितीम मिळत आहे. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना अधिकार दिले याबाबत चित्र स्पष्ट करण्यात येणार. तसेच सुप्रीम कोर्ट निकाल नुसार विधीमंडळामधील पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही हे देखील आजच्या बैठकीत सांगण्यात येणार..

राजकीय पक्षाला मुख्य प्रतोद, गटनेता नेमण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी केलेल्या नेमणूक लागू होत नाही हे सांगण्यात येणार आहे. बैठकीला येणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी आमदार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. ते पक्षा बरोबर आहेत याचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT