chandrashekhar bawankule 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार एकेदिवशी मोदींचं नेतृत्व मान्य करतील; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला आहे. मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोदींविरुद्ध शरद पवार असं चित्र दिसणार आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्र निर्माणाकरिता पाठिंबा दिला आहे. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी अजित पवार हे सरकारमध्ये आले आहेत. शिंदेंच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस, अजित पवार राज्यभर फिरत आहेत. मात्र काही लोक सरकारच्या कामामुळे विचलित झाले आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांनी त्यांच्या भेटीबद्दल स्पष्ट सांगितले आहे. एका कुटुंबातील दोन लोक भेटले तर त्याला राजकीय समजू नये. मात्र, एक वेळ असा येईल की मोदींच्या नेतृत्वात भारत समोर जातोय, हे पाहून शरद पवार एकेदिवशी मोदींचे नेतृत्व मान्य करतील. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्याची वाट पहावी लागते, असं बावनकुळे यांनी नमूद केलं.

शरद पवार जरी आज मोदीजींचे नेतृत्व मान्य करत नसले तरी काळ बदलतो आणि पवार एक ना एक दिवस विचार करतील की मोदींच्याच नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांमध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, असा मला विश्वास असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT