Sharad Pawar Withdraw Resignation timeline Know political events that happened in the last four days  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News : पवारांचं भाकरी फिरवण्याचं वक्तव्य ते राजीनामा परत घेणं; चार दिवसात नेमकं काय घडलं?

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली त्यानंतर राजीकय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यांनी ‘लोक माझा सांगाती’ या आपल्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक आपली निवृत्ती जाहीर केली.

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत त्यांचा हा निर्णय मागे घेतला आहे.

तीन दिवसांच्या या राजीनामा नाट्यात बऱ्याच घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. नेमकं या तीन दिवसात काय घडलं चला सविस्तर जाणून घेऊया.

१. २७ एप्रिल रोजी शरद पवार यांनी पक्षातील नेतृत्वात बदल करण्याबाबात सूचक विधान केलं. पवार लवकरच भाकरी फिरवावी लागेल असे म्हणाले होते. यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढण्यात आले.

२. त्यानंतर २ मे रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

३. पवारांनी हा निर्णय जाहीर करताच त्याचे पडसाद राज्यभरात दिसून आले. यानिर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याचा तसेच हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

४. त्यानंतर ४ मे रोजी पवारांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा माण ठेवत देत दोन-तीन दिवसात फेरविचार करत अंतिम निर्णय घेण्याचं आश्वासन कार्यकर्त्यांना दिलं.

५ . ५ मे सकाळी ११ वाजून १५ मिनीटांनी शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनाना पक्षाच्या निवड समितीकडून नामंजूर करण्यात आला. यासंबंधी ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयावर शरद पवार यांच्या निवसस्थानी चर्चा झाली. आज दुपारी साडेबारा वाजता शरद पवार हेच अध्यक्ष राहातील हा ठराव शरद पवार यांच्याकडे देण्यात आला.

६. शेवटी संध्याकाळी पाऊणे सहा वाजता शरद पवार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहचले आणि आपण अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

७. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गेले तीन दिवस राज्यभरातील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या निर्णयाची वाट पाहात होते. अखेर आज कार्यकर्त्यांनी उत्साहात या निर्णयाचं स्वागत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT