Shashikant Warise Case esakal
महाराष्ट्र बातम्या

Nilesh Rane : आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार? निलेश राणेंनी राऊतांना सुनावलं

पत्रकार वारीसे यांच्या मृत्यूवरुन राज्यातलं राजकारण चागलंच तापलंय.

सकाळ डिजिटल टीम

पत्रकार‎ वारीसे यांचा अपघात करणारा हा निलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे.

Shashikant Warise Case : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) राजापूरमधील पत्रकार‎ शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला कारनं जोराची‎ धडक देत या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.‎ मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या‎ घटनेचा सर्व पत्रकारांच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यातच पत्रकार वारीसे यांच्या मृत्यूवरुन राज्यातलं राजकारण चागलंच तापलंय. राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT) स्थापना करण्याची घोषणा केलीये. तर, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत फडणवीसांना पत्रही लिहिलंय. दरम्यान, आज (शनिवारी) रत्नागिरीत ठाकरे गटाचे नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी वारीसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नाणार प्रकल्पाला (Nanar Project) विरोध करणाऱ्यांनी आज रत्नागिरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विनायक राऊतही सहभागी झाले होते.

पत्रकार‎ वारीसे यांचा अपघात करणारा हा निलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळं वारीसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे, असा आरोप राऊतांनी राणेंवर केला. तर, याप्रकरणी निलेश राणेंनी (Nilesh Rane) देखील ठाकरे गटावर पलटवार केलाय.

मला विनायक राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा, असं निलेश राणे म्हणाले.

राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामं संपली असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला (Pandharinath Amberkar) अटक करण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT