shivsena esakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील मंत्र्यांचे दौरे रद्द; आज सह्याद्रीवर होणार बैठक

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्क सादर केला होता. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय शिवसेना नाव दोन्हीही गटाला वापरता येणार नाही. तर नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे. त्यामुळे आजचाच दिवस आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाची उद्या सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान शिंदे गटातील सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले असून. रविवारी होणाऱ्या बैठकीला या सर्वाना हजर रहावे लागणार आहे.

दरम्यान या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवलं असून ते रद्द केलेलं नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील निर्णय ठाकरे गटाच्या किवा शिंदे गटाच्या बाजुने गेल्यास धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा ते मिळू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra-Worli-Sea-Link: लक्झरी कारवाल्यांची मुजोरी! सी-लिंकवर रेसिंग करताना अपघात, Mercedes अन् BMW मालकांना अटक

Bajaj Housing IPO: शेअर बाजारात आज लिस्ट होणार बजाजचा आयपीओ; गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होणार का?

झाडाची छाटणी किंवा साल काढल्यास तब्बल इतक्या हजारांचा दंड; सरकारकडून आता कडक नियम

काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोळ्यादेखत मूकबधिर मुलगा बंधाऱ्यात बुडाला; मूकबधिर आईलाही ओरडताही आलं नाही अन्..

एक नाही तर दोन मुलींचा बाप होता गोविंदा पण एकीचं तिसऱ्या महिन्यातच झालं निधन; पत्नीने सांगितलं मृत्यूचं कारण

SCROLL FOR NEXT