Prakash Ambedkar 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : ...तर आंबेडकरांची कोणासोबतही युती होणार नाही ; शिंदे गटाचा सल्ला की इशारा?

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Shirsat : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर स्पष्टीकरण दिले. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडावी त्यानंतर आम्ही युतीचा विचार करु, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. यावर शिंदे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Shinde group MLA Sanjay Shirsat reaction on Prakash Ambedkar)

प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करु नये, अशी मागणी शिंदे गटाची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधातला विरोध हा आपला मित्र हे राजकीय समीकरण आहे. निवडणुका ठाकरेंसोबतच लढवणार. भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, "राजकारणात भूमिका थोडी मागे पुढे करावी लागते. जर असे केले नाही तर मला वाटत नाही प्रकाश आंबेडकर यांची कोणासोबत युती होईल. जास्त न ताणता प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट करावी. जणेकरून येणाऱ्या निवडणुकीत वेगळा संदेश त्यांना देता येईल. ते मोठे नेते आहेत."

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले - 

भाजपला आमचा विरोध कायम आहे. भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर आम्ही विचार करु. तसेच येणाऱ्या निवडणुका एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.

आमची युती चार भितींच्या आत ठरली. मात्र त्याची घोषणा झालेली नाही. माझी आणि माझ्या पक्षाची ताकद मला माहिती आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT