Shiv Sena Symbol Hearing 
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिंदे गटाने बाहेर काढला हुकमी एक्का

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु आहे. 'शिवसेना' हे पक्षाचं नाव कुणाकडे राहणार. पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena Symbol Hearing)

या संदर्भात दोन्ही गटाचे वकील ताकदीने युक्तिवाद करत आहेत. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी महत्वाची बाजू मांडली. 

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात निर्णय होईपर्यंत सुनावणी घेऊ नका, अशी मागणी आयोगाकडे केली. सुप्रीम कोर्टात जर आमदारांना अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाचा निर्णय हास्यास्पद ठरणार आहे.

यावर जेठमलानी म्हणाले, अद्याप आमदारांना अपात्र ठरवले नसल्याने धनुष्यबाणाचा निर्णय शक्य आहे. आमदार, खासदारांची संख्या पाहता शिंदे गटाकडे बहुमत आहे. 

शिदें गटाने प्रभावी मुद्दा मांडला. आमदार, खासदारांची संख्येचा मुद्दा जेठमलानी यांनी मांडला. कुठल्याही विधिमंडळात आणि घटनेच्या चौकटीत याचे महत्व दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यामुळे बहुमताची आकडेवारी लक्षात घ्यायला पाहीजे, असा मुद्दा महेश जेठमलानी यांनी मांडला. 

शिंदे गटाकडे १२ खासदार, ४० आमदार, संघटनाम्तक प्रतिनिधी ७११, स्थानिक स्वराज्य संस्थेंतील प्रतिनिधी २०४६ आणि प्राथमिक सदस्य ४ लाखांच्या आसपास आहेत, असे शिंदे गटाचे म्हणने आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग काय निर्णय देणार हे महत्वाचे असणार आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील सगळे बदल हे बेकायदेशीर आहे. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. ही घटना बदलत पक्षप्रमुख हे पद स्वत:साठी उद्धव ठाकरे यांनी तयार केले आणि पक्ष हाती घेतला. हे केल्यामुळे ते शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत. हा बोगसपणा आहे. हा महत्वाचा दावा शिंदे गटाने केला आहे. हा कळीचा मुद्दा शिंदे गटाने निवडणूक आयोगात मांडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT