MP Adhalrao Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Adhalrao Patil: म्हाडाचं अध्यक्षपद देऊन बोळवण केल्यानंतर आढळराव पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, अद्याप...

शिरुर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आढळराव पाटलांना पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : शिरुर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या आढळराव पाटलांना पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खरंतर तीन टर्म खासदार राहिलेल्या आणि पुन्हा एकदा लोकसभा खासदार व्हायची इच्छा असलेल्या आढळरावांना म्हाडाचं अध्यक्षपद देऊन बोळवण करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर आता आढळरावांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (shirur ex mp adhalrao patil explanation after being oppointed as president of pune mhada)

शिरुर मतदारसंघात आढळरावांची बॅनरबाजी

शिरुर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असल्यानं ठिकठिकाणी आढळरावांनी बॅनरबाजी केल्याचंही दिसून येत आहे. जनतेच्या मनात 'अढळ', काल आज आणि उद्याही! अशा आशयाचे फ्लेक्स ठिकठिकाणी लागले आहेत. (Latest Marathi News)

मीच महायुतीचा उमेदवार

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आढळराव म्हणाले, "मला वाटतं की सर्वांना गैरसमज झाला आहे की मी लोकसभेचं तिकीट सोडून मला पक्षानं हा दुसरा पर्याय दिला आहे. पण असं आजिबात नाही, गेल्या वर्षा दीडवर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या मनात होतं की मला मंत्रीपदाच्या दर्जाचं पद मिळावं कारण मी पक्षात वरिष्ठ आहे. (Latest Maharashtra News)

मी गेले पाच वर्षे मतदारसंघात फिरतोय तो फक्त एका म्हाडाच्या पदासाठी दावा सोडेल असं नाही. दावा सोडण्याचा विषयच नाही कारण आमच्या पक्षात ठरलेलं आहे की मी निवडणूक लढणार आहे. महायुतीचा मीच उमेदवार आहे आणि निवडून येणारा मीच खासदार असणार आहे यात शंका नाही" (Marathi Tajya Batmya)

शिरुरमधून दोन नावांची चर्चा

दरम्यान, शिरुरच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळेच आढळरावांना म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT