Shishupal Patle_Nana Patole 
महाराष्ट्र बातम्या

Vidarbha Congress: पटोलेंनी दिला भाजपला मोठा झटका! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, विदर्भातील गणितं बदलणार?

Shishupal Patle Bhandara Ditches BJP for Congress in Vidarbha : नाना पटोलेंच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवन इथं शिशुपाल पटले यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Shishupal Patle Marathi News :भंडारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा झटका बसला आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं आता विदर्भातील गणितं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवन इथं शिशुपाल पटले यांचा अखेर काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. २००४ मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पटले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर सलग दोन वेळेस ते याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. या मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे, त्यामुळं विधानसभेला काँग्रेसला याचा मोठा फायदा होऊ शकतो. शिशुपाल पटले हे पोवार समाजाचे नेते असून पूर्व विदर्भात या समाजाची मोठी ताकद आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेशाचं कारण काय?

भाजपनं आपल्याला वारंवार अपमानित केल्याचा आरोप शिशुपाल पटले यांनी केला आहे. कार्यक्रमांना न बोलावणे, मंचावर स्थान न देणं महत्वाच्या गोष्टींसाठी डावलणं असे प्रकार सुरु असल्यानं अखेर वैतागून पटले यांनी काँग्रेसची वाट धरली आहे. आता ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

तुमसरमधून देणार उमेदवारी?

तुमसर विधानसभा मतदारसंघातून पटले यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पटले हे विधानसभ लढवण्यासाठी इच्छूक नव्हते पण आता त्यांचं मन वळवण्यात नाना पटोले यांना यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Chhagan Bhujbal : घड्याळाच्या टिकटिकने तरले भुजबळ..! येवला, लासलगाव, विंचूरसह प्रमुख गावाच्या मताधिक्क्याने विजय सोपा

ST Mahamandal : एसटी महामंडळाला दिवाळीत मिळाले २० कोटींचे उत्पन्न

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

SCROLL FOR NEXT