महाराष्ट्र बातम्या

Shiv Rajyabhishek 2023: छत्रपतींच्या मूर्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन संपन्न, फडणवीस, उदयनराजे,राज ठाकरे उपस्थित

किल्ले रायगडावर लोटला शिवसागर

रुपेश नामदास

अलिबाग, ता. २: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने देशभरातून शिवसागर किल्ले रायगडावर लोटला आहे. सकाळ ८.१५ वाजता राज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी हजारो कार्यकर्त्यांच्या रांगा किल्ले रायगडाक्या पायऱ्या चढत होत्या.

सर्वप्रथम छत्रपतिच्या मूर्तीचे मंत्र्घोषणात पूजन करण्यात आले. यासाठी सकाळी ७.०० वाजल्यापासून मान्यवर किल्यावर येण्यास निघाले होते, मनसे प्रमुख राज ठाकरे सहकुटुंब, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बरणे, सुनील तटकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते भल्यापहाटे गडावर दाखल झाले.

राज्यभरातून हे शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देत शिवराज्यभिषेक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गडावर वेळेत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. प्रशासनाने शिवप्रेमीना प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन केले आहे. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले आहे.

रायगड पोलिस रात्री १२.०० वाजल्यापासूनच तैनात असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पहारा देत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचल्यानंतर वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे, या पार्किंगमध्ये वाहने उभी केल्या नंतर एस टी महामंडळाचा बसने गडाच्या पायऱ्या पर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

रोप वे ने अती महत्त्वाच्या व्यक्ती, सरकारी कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांना गडावर नेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर, पायथ्यापासून तरुण शिवप्रेमीना पायाऱ्याने गड चढण्याचे आव्हाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT