Eknath Shinde_Devendra Fadnvis esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : 'जनता आमच्या पाठीशी, येणाऱ्या विधानसभा-लोकसभेला सेना-भाजपच जिंकेल'

एखाद्या राज्याचा निकाल यावर सर्व देशाच्या निवडणुकांचा अनुमान बांधून वक्तव्य करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे.

अरुण गुरव

यापूर्वी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

मोरगिरी : एखाद्या राज्याचा निकाल यावर सर्व देशाच्या निवडणुकांचा अनुमान बांधून वक्तव्य करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. या निवडणुकीचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर (Lok Sabha Election) होणार नाही. महाराष्ट्रावर तो बिलकूल होणार नाही, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केलं.

अडीच वर्षांपूर्वीचे महाराष्ट्राचे घरात बसून कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिले आहे. आमचे दहा महिन्यांचे सरकार ज्या जोमात काम करतेय तेही जनता पाहात आहे. येणाऱ्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका शिवसेना-भाजप महायुती (Shiv Sena-BJP Alliance) ताकदीने लढून बहुमताने जिंकेल असा विश्वास आहे, असे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

दौलतनगर येथे शासन आपल्या दारी या योजनेच्या राज्यस्तरीय प्रारंभासाठी मुख्यमंत्री शिंदे आज दौलतनगर (ता. पाटण) येथे आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. सर्वसामान्य माणसाला शासनाच्या योजना मिळण्यासाठी शासन दरबारी त्याला खेटे मारायला लागू नये, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

'पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत'

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे. जनमताच्या कौल आणि त्याचा आदर करणारे आम्ही आहोत. त्याचा आदर आम्ही केलेला आहे. एखाद्या राज्याचा निकाल यावर सर्व अनुमान आपण बांधू शकत नाही. यापूर्वी २०१९ ला झालेल्या निवडणुकीत बहुमताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. त्या वेळी मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्याच्या निवडणुका भाजपचे जिंकल्या आहेत, ही वास्तवता आहे. त्यामुळे एका राज्याची निवडणूक त्या-त्या राज्याची परिस्थिती वेगळी असते. त्याचा अनुमान काढून त्याचा संपूर्ण देशावर परिणाम होईल, असे वक्तव्य करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे.

'लोकसभा महायुती ताकदीने जिंकेल'

या निवडणुकीचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार नाही, महाराष्ट्रावर तो बिलकूल होणार नाही. महाराष्ट्राचे घरात बसून कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिलेले आहे. आमचे दहा महिन्यांचे सरकार ज्या जोमात काम करतेय तेही जनतेने पाहिले आहेत. कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो. आज जे निर्णय घेतले आहेत, ते जनतेसमोर आहेत. महाराष्ट्रातील जनतेला काम करणारे सरकार पाहिजे, घरी बसणारे नको आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना न्याय देणाऱ्या लोकांच्या पाठीशी या महाराष्ट्रातील जनता उभी राहील. पुढच्या काळात दुप्पट वेगाने आमचे सरकार काम करले. पुढील येणाऱ्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका शिवसेना- भाजप महायुती ताकदीने लढून बहुमताने जिंकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

कर्नाटकमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या क्रूरशाहीचा हा पराभव असल्याचे म्हटले आहे. त्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘पराभव कोणाचा, विजय कोणाचा हे सर्वांना माहीत आहे. आपलं घर जळतंय ते विझवायचे सोडून दुसऱ्याचे घर जळताना आनंद व्यक्त करणारी, आसुरी आनंद व्यक्त करणारी काही मंडळी आहेत. बेगाने शादी मे अब्दुला दिवाना अशी स्थिती त्यांची आहे. काम करणाऱ्यांच्या पाठीशी या महाराष्ट्रातील जनता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT