Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

“काय झाडी… काय डोंगर…सेनेने मुखपत्रातून बंडखोरांना चांगलेच खडेबोल सुनावले

धनश्री ओतारी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. अशातच, शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप चांगलीच चर्चेत आली आहे. “काय झाडी… काय डोंगर… काय हाटील… एकदम ओके! त्यांचे हे शब्द चांगलेच गाजत आहेत. शहाजीबापू पाटील यांच्या याच वाक्यावरुन सामना अग्रलेखातून बंडखोर नेत्यांना सेनेने (Shiv Sena criticizes rebel leaders from Shahajibapu Patil audio clip maharashtra politics)खडेबोल सुनावले आहेत.

हिंदुस्थान तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत.

शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद ‘मऱ्हाटी’ मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते! असा इशारा सामनातून बंडखोरांना देण्यात आला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या. पण गेली 56 वर्ष टिकली ती फक्त शिवसेनाच, असंही अग्रलेखातून म्हटलंय. बंडखोर आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. हा दिलासाच आहे. या दिलाशाचे लाभार्थी कोण आहेत, ते भविष्यात उघड होईलच, असाही टोला लगावण्यात आलेला आहे.

भाजप आपल्या मित्रांचा, सहकारी पत्रांचा घास गिळूनच शांत होतो, हे आता झाडीतल्या आमदारांना आणि नेत्यांना लवकरच कळेल, असाही टोला अग्रलेखातून हाणण्यात आला. बंडखोर आमदारांच्या गटाला महाशक्तीचा अजगरी विळखा पडलाय. हा अजगर अख्खा गिळावा तसे या गटाला गिळून पुढे जाईल, अशा शब्दांत सामनातून टीका करण्यात आली आहे.

बंडखोर आमदार सांगतायत, की आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेना कुठे सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो. पण या बोलघेवड्यांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले आणि मंत्री झाले. त्यांना आता महाराष्ट्राची झाडी-झुडुपू, शिवसेना आवडेनाशी झाली. महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठेने काम करणार आहात का? रामाचं नाव घेता आणि रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत.

बंडखार आमदार रामाचं नाव घेतता आणि रावणाची कृती करतात, अशी तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT