Sanjay Raut vs Shivendraraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवेंद्रराजे.. कशाला तोंड उघडायला लावताय, तुम्ही कितीवेळा पक्ष बदललेत; राऊतांचा निशाणा

सकाळ डिजिटल टीम

'भाजपला इतकंच वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजेंना 42 मतं द्यायला पाहिजे होती.'

कोल्हापूर : राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देताना संभाजीराजेंचा (Chhatrapati Sambhajiraje) ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहितीय. सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केलाय, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी शिवसेनेवर केली होती. यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना खडेबोल सुनावले.

शिवेंद्रसिंहराजेंनी स्वत: कितीवेळा पक्ष बदलले आहेत. त्यांच्या घराण्यातील कोणत्या लोकांनी कितीवेळा पक्ष बदललेत आहेत, ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale) यांना राजकीय पक्षांचं वावडं आहे का? तुम्ही आम्हाला कशाला तोंड उघडायला लावताय, अशा शब्दांत संजय राऊतांनी त्यांना फटकारलंय. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासून आदर होता आणि आजही आहे, असंही राऊत म्हणाले.

राज्यसभेचा हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकंच वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती, ती का दिली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसैनिकच निवडून जाणार, हे आम्ही ठरवलं होतं. त्यासाठी पहिल्यापासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा आम्ही विचार करत होतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले होते शिवेंद्रसिंहराजे?

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांच्यामागं मोठा जनसमुदाय आहे. संपूर्ण राज्यातील युवक आणि मराठा समाज त्यांच्या मागं आहेत. मात्र, राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देताना संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहितीय. सर्वांनी छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम केलाय, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी साताऱ्यात शिवसेनेवर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT