सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे आमदारही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते कायदेशीर सल्लाही घेत आहेत. ठाकरे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन दिल्यानंतर आता शिवसेना देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. अध्यक्षांवर टीका केल्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी शिवसेनेचे आमदार आता करणार आहेत.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, मी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटणार आहे. राहुल नार्वेकर ज्या पदावर बसले आहेत. त्या पदाचा आणि त्या खुर्चीचा अपमान संजय राऊत यांनी केला आहे. म्हणून त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झाली पाहिजे. आम्ही याबद्दल कायदे तज्ञांशी बोललो आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये करणाऱ्या मूर्ख माणसांवर कारवाई झाली पाहिजे असंही शिरसाट म्हणले आहेत.
तर पुढे बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांना शरद पवार यांनी पायपुसणी असल्याचं शिरसाट यांनी केलं आहे. तर संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शरद पवार शरद पवार करत त्यांच्या घरी येणं जाणं. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंना घेऊन जाणं. खऱ्या अर्थाने संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी असल्याचं शिरसाट यांनी म्हंटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे, तर संजय राऊत म्हणतात शिंदे गटाचा पोपट मेला आहे. त्यावर शिरसाट म्हणाले की, कोणाचा पोपट मेला आहे ते लवकरच समजेल. महाविकास आघाडीचा पोपट आता नाही आधीच मेला आहे. आता त्याचे दिवस घालण्याचे दिवस आहेत. त्यांची महाविकास आघाडी जास्त दिवस टिकणार नाही. त्यांच्या बैठकीवरून दिसून येत आहे. त्याच्यात कधीच मेल मिलाप होणार नाही. संजय राऊत ज्याच्यासोबत असेल त्यांच्यासोबत हेच होणार आहे असा सणसणीत टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.