Shivsena Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दबाव? नार्वेकरांचा खळबळजनक दावा

राहुल नार्वेकर यांनी निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे.

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय देण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सातत्याने केला जात आहे. ठाकरे गटाकडून होत असलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मी नियमातच काम करणार असे देखील नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

अनेक माध्यमातून अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी अपात्रतेसंदर्भातील निर्णय 'महाराष्ट्र मेंबर्स ऑफ असेंब्ली डिसक्वॉलिफीकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन अॅक्ट १९८६'मध्ये दिलेले सर्व नियम आणि संविधानात दिलेल्या तरतूदींच्या आधारेच निर्णय घेणार. मला कोणी कितीही प्रभावित करण्यचा प्रयत्न केला किंवा आरोप केले तरी मी त्यातून कुठल्याही प्रकारे प्रभावित होणार नाही. नियमानुसारच काम करणार असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

माझा परेदेश दौरा २६ तारखेलाच रद्द केला होता. मी सीपीएला कळवलं होतं की इकडे काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी कॉन्फ्रससाठी उपस्थित राहू शकणार नाही. पण २८ तारखेला त्या दौऱ्याविषयी चर्चा करून आपण तो दौरा रद्द करायला लावल्याचं चित्र निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. त्यांचा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. पण अध्यक्ष अशा धमक्यांना घाबरत नाहीत. तुमच्या या कृतीने प्रभावित होणार नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

दरम्यान शिवेसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. येत्या ६ ऑक्टोबरला होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून आता सुनावणी ९ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. दोन वेळा सुनावणीची टेंटिटीव्ह तारीख आली पण त्यावेळी प्रकरण लिस्टेड झालं नाही.

कोर्टासमोर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अपात्रतेच्या सुनवणीचा रोडमॅप सादर करणार आहेत, त्यामुळे सुनावणीला महत्व आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना लवकर अपात्र करा अस म्हणत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

SCROLL FOR NEXT