ShivSena MLA 
महाराष्ट्र बातम्या

ShivSena MLA Desqualification: शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल यावर्षी लागणं कठीण; प्रक्रियेला का होतोय उशीर वाचा?

आजच्या सुनावणीवेळी काय काय घडलं जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली असून ठाकरे-शिंदे या दोन्ही बाजूंकडचा युक्तीवाद संपला आहे. यासाठीचं एक वेळापत्रकही समोर आलं आहे. त्यातील तपशीलानुसार, यावर्षी या प्रकरणाचा निकाल लागणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. (Shiv Sena MLA disqualification result difficult to get this year)

सुनावणीत काय घडलंय?

सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणीला उशीर होत असल्याच्या कारणावरुन फटकारल्यानंतर आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. याच वेळापत्रकही समोर आलं आहे. ज्यामध्ये कागदपत्रे तपासणी, साक्ष नोंदवणे आणि आमदारांची उलट तपासणी करणे याचा समावेश आहे.

संबंधित प्रकियेला किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी लागण कठीण असल्याचं बोललं जात आहे.

३४ याचिकांवर होणार सुनावणी

या तीन महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन असल्यानं ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. यामध्ये 34 याचिका आहेत, सर्वांच्या याचिकेवर स्वतंत्र युक्तिवाद होणार आहे. त्यामुळं कमीत कमी 4 ते 5 महिने लागण्याची शक्यता आहे.

आम्हाला शेड्युल 10 लागू होत नाही- शिंदे गट

दरम्यान, याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे, ते का केलं जातं नाही? असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे. मात्र, याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला आहे.

शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्र करु नका सर्वांवर वेगवेगळी सुनावणी घ्या, असा युक्तिवाद या दरम्यान केला. तसेच आम्हाला आमदार अपात्रतेबाबत संविधानातील शेड्युल १० लागू होत नाही, असा दावा शिंदे गटानं केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT