shivsena political News esakal
महाराष्ट्र बातम्या

सेनेतले अंतर्गत वाद चव्हाट्यावर; खासदाराची CM ठाकरेंवर वादग्रस्त शब्दांत टीका

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येतंय

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येतंय

सध्या अनेक घडामोडींमुळे राजकीय वातावरण चागलंच गढूळ झालं आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलं असतान आता शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. (shivsena political News) राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलंल जात अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

आधी भाजपाकडून विरोध झाला आता मात्र आमचे मित्रपक्षच आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात 25 ते 29 मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी जाधव यांच्यावर आहे. पुण्यातील विकासकामे, समस्या, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत तसा अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहे. तत्पुर्वी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.

खासदार जाधव म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्याने येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना 60 टक्के आणि इतरांना 20-20 टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे पोहचवणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी त्यांना विनंती असल्याचे संजय जाधव म्हणाले. कार्यकर्त्यांना अन्यायाची भावना असून वरिष्ठांनी आणखी लक्ष घालायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT