sunil raut Latest News esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बोलावलेली बैठक संपताच सुनिल राऊत म्हणाले, आता आम्हांला...

संतोष कानडे

मुंबईः उद्धव ठाकरे यांनी विविध विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिल राऊत म्हणाले की, आज बैठक झाली त्याच्यासाठी बोलावलं होतं. उद्धव साहेबांना पाहिल्यानंतर आम्हाला एक एनर्जी येते. आताही एनर्जी घेऊन आम्ही आमच्या विभागात जाणार आणि पुन्हा एकदा शिवसेना मजबूत करण्याचं काम आजपासून करणार आहोत.

ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे कोणीही अस्थिर नाही. आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे निष्ठावान शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांनी योग्य मार्गदर्शन केलं असून पक्ष मजबूत आहे, संघटनादेखील मजबूत आहे. शिवसेनेची सत्ता कुठल्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रात येणार आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करा लोकांशी संपर्क वाढवा, असं आवाहन केल्याचं त्यांनी सांगितलं.

''आम्हांला चिंता करण्याची गरज नाही''

शिंदे गटात काही जण गेले पण बाळासाहेबांवर प्रेम करणारा निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे, त्यामुळे आम्हाला चिंता करायची गरज नाही. जे गेले ते उपरे होते. अशी प्रतिक्रिया सुनिल राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT