Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv sena crisis: ''एक काम करा तुम्हीच इथं येऊन बसा अन् काय करायचं ते करा'' सुनावणीवेळी CJI चिडले; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमकं काय घडलं?

संतोष कानडे

Shiv sena NCP disqualification case: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपत्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टातमध्ये सुरुवातीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपत्रता प्रकरणी सुनावणी झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नव्हतं. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं, यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांना यापूर्वीच कोर्टाने नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं. मंगळवारच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार गटाने वेळ मागितला आहे. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टात नेमकं काय झालं, याची माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. मंगळवारी कोर्टाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणीवेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकू घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.

''कोर्टाने संकेत दिले आहेत की आमदार अपात्रता प्रकरण हे आम्ही सुप्रीम कोर्टातच ऐकू.. विधानसभा निवडणुकीच्या आधी याप्रकरणी निकाल अपेक्षित आहे. शक्यता आहे की सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात या प्रकरणाचा निकाल लागू शकतो.'' असं अॅड. शिंदे यांनी सांगितलं.

कोर्टरुममध्ये ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला सांगितल की, या प्रकरणाला विलंब लागतो आहे. तुम्ही लवकर तारीख द्या. त्यावर कोर्ट म्हणाले तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ.. सीजेआय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या वकिलाला अशा प्रकारे सुनावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : शरद पवार यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT