shiv sena sanjay raut news criticize bjp government on advay hiray arrest malegao 
महाराष्ट्र बातम्या

सत्तेत असणाऱ्या 'या' आरोपी नेत्यांवर कारवाई का नाही? अद्वय हिरे अटकेवरुन ठाकरे गट आक्रमक

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना बुधवारी एका प्रकरणात भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. याविषयी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना बुधवारी एका प्रकरणात भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. याविषयी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून सुडाचं आणि दबावाचं राजकारण सुरु आहे. हिरे यांनी मालेगावमधून निवडणूक लढवू नये यासाठी त्यांना अटक करण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आणि मुंबई महाराष्ट्रात समावेश व्हावी या लढ्यामध्ये भाऊसाहेब हिरे यांचे मोठे योगदान होते. अद्वय हिरे हे त्यांचे नातू आहेत. त्यांना काल अटक करण्यात आली. नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जासंदर्भात त्यांच्यावर आरोप आहेत, असं राऊत म्हणाले.(shiv sena sanjay raut news criticize bjp government on advay hiray arrest malegao)

हिरे भाजपमध्ये असताना देखील आरोप होते. पण, ते आता शिवसेनेत आलेत. मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी जी प्रचंड सभा घेतली. त्यामुळे भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. शासकीय यंत्रणांचा वापर करुन गेल्या वर्षभरात ४० च्या आसपास गुन्हे हिरे कुटुंबियांवर दाखल केले आहेत, असं राऊत म्हणाले.

स्वत: दादा भूसे यांच्यावर सरकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे १७८ कोटी रुपयांचे शेअर घेऊन आफरातफर केल्याचा आरोप आहे. आम्ही यंत्रणाकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर काय कारवाई केली. राहुल कुल यांच्याबाबत देखील ५०० कोटीचे थेट मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत, पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींचे आरोप भाजपने केले होते. पण, ते आता भाजपसोबत आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली.

हसन मुश्रीफ यांच्यावरही भाजपने आरोप केले होते. पण, ते आता जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यावर कारवाईची आम्ही मागणी करतोय. पण, कारवाई होत नाही. काल अद्वेत हिरे यांना अटक करुन सरकारने दाखवून दिलं की त्यांना सुडाचं राजकारण करायचं आहे. हिरे यांच्यावर मालेगावची निवडणूक लढवू नका यासाठी दबाव होता. त्यातून कारवाई झाली. पण, हिरे एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहे, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी ज्याप्रकारे कारवाई केली त्याची नोंद आम्ही घेतली आहे. नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणात, ललित पाटील प्रकरणात काय कारवाई केली. २०२४ नंतर यासंबंधित सर्व पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, असं संजय राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT