राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदारांची मत समजून घेत उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सूचकपणे सांगितलं आहे. तसेच याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena supports presidential candidate Draupadi Murmu)
भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले.(Presidential election 2022 news)
यासंदर्भात मातोश्रीवर बैठक घेण्यात आली. यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी घेतला आहे. अशी माहिती दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिली आहेत. त्यावर बैठकीमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणार अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही.
यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असल तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो.
यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असल तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो.
यापूर्वीसुद्धा प्रतिभा ताई यांना पाठिंबा दिला होता. आणि एनडीएच्या उमेदवाराला तेव्हा पाठिंबा दिला नव्हता. कारण प्रतिभा ताई पाटील पहिली महाराष्ट्राची मराठी महिला. आम्ही प्रणव बाबु मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला आहे. आम्ही एनडीएत असतानाही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे.
तसेच पक्षप्रमुख कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. पक्षप्रमुखांनी सर्वांची मते समजून घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. खासदारांचा बंडखोरीबद्दल विचारल्यानंतर या सर्व अफवा आहेत. काल बैठकीला सगळे खासदार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते. यासोबतच भावना गवळीदेखील नव्हत्या. अशी माहिती राऊतांनी यावेळी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.