maharashtra assembly speaker election 2022 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचा राहुल नार्वेकरांना पाठिंबा

नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय

सकाळ डिजिटल टीम

नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलंय

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली आहे. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, निवडीत शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाचे राहुल नार्वेकरांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. (maharashtra assembly speaker election 2022) नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मतदान केलं नसल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे आता या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई होते हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे. (maharashtra politics)

या निवडप्रक्रियेत राहुल नार्वेकरांना बहुमत मिळालं असून राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. त्यामुळं राहुल नार्वेकर विजयी झाले असून भाजपा-शिंदे सरकारची विधानसभेवर वर्णी लागली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झाले असून बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुजन विकास आघाडी आणि मनसेनेही राहुल नार्वेकरांना मतदान केलं आहे. भाजपा उमेदवार राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांचे मतदान झालं आहे.

दरम्यान, मविआचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मतदान केलं आहे. राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे भाजपा आणि शिंदे सरकारने एक मोठी लढाई जिंकली आहे. राहुल नार्वेकर हे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT