Shiv Sena will host program to welcome Sanjay Raut in Mumbai after ed raid  sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचं मुंबईत उद्या शक्तिप्रदर्शन; राऊतांचं होणार स्वागत

सकाळ डिजिटल टीम

ईडी (ED) ने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत मोठा घोटाला उघड केल्याचा दावा केला आहे. यानंतर आता संजय राऊत उद्या दिल्लीतून मुंबईत परत आल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली जात आहे.

शिवसेना राऊत यांच्या स्वागता निमीत्ताने मुंबईत मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारीत आहे. या विषयीची अधिक माहिती अशी की, राऊत यांचे मुंबई विमानतळापासून ते भांडूप येथील त्यांच्या घरापर्यंत त्यांच स्वागत केलं जाईल, त्यासाठी चाळीस बसेस, ढोल ताशा पथकं अशी जंगी तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्यासह अनेक मंत्री देखील विमानतळावर उपस्थीत असण्याची शक्यता आहे.

दरम्यान संध्याकाळी चार वाजता संजय राऊत हे मुंबई विमानतळावर पोहचतील, त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहरातून अनेक शिवसैनिक येणार आहेत, यानिमीत्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या स्वागत कार्यक्रमात मुंबईतील शिवसेनेचे सगळे आमदार, खासदार आणि मंत्री देखील सहभागी होणार आहेत.

आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी सरकार तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांवर कायद्याचा दुरुउपयोग होत असल्याचा आरोप केला. दरम्यान संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईत राऊतांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT