Shivaji Maharaj Statue Structural Consultant Chetan Arrested From Kolhapur:
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलवर गुन्हा दाखल केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पाटीलला मध्यरात्री तीनच्या सुमारास अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
एकीकडे चेतन पाटील पोलिसांच्या हाती लागला असला तरी या प्रकरणातील ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळल्याप्रकरणी कल्याणमधील शिल्पकार जयदीप आपटे आणि कोल्हापूरचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर हेतुपुरस्सर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
दुसरीकडे, या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी जयदीप आपटे याच्या पत्नीचे जबाब नोंदवला आहे. निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितले की, मालवण पोलिसांच्या पथकाने आपटे याच्या पत्नी आणि मुलाचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, आपटेचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे मालवण पोलीस निरीक्षकांनी सांगितले.
दरम्यान रोजकोट किल्ल्यावर घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरात संताप पसरलेला असून, या कामात हलगर्जीपण किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे. काल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिल्पकार जयदीप आपटे याच्या घरी धडक दिली होती.
या घटनेनंतर विरोधी पक्षांनीही या कामाचा कंट्रातदार, शिल्पकार आणि सरकारविरोधात आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान परवा घटनास्थळाची पाहणी करण्यास गेलेल्या राणे आणि ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याची व्हिडिओही व्हायरल झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.