state of water in every district of Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

"कोरड... घशाला अन्‌ शिवाराला", महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशी आहे पाण्याची स्थिती

उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांकडून पेरणी व लागवड मराठवाड्याच्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ३६.६९ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

पुणे

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या पुरेशा पावसाअभावी लांबणीवरजेमतेम दहा हजार ९१५ हेक्टरवर पेरण्या भात आणि कडधान्यांचे उत्पादन धोक्यात सध्या उजनीतील पाणीसाठा मायनसमध्ये आहे. पिंपळगाव जोगे आणि घोड ही दोन धरणे कोरडी पडली आहेतभामा आसखेड, येडगाव, पवना, वरसगाव,

कासारसाई या चारच धरणांमधील पाणीसाठा २० टक्के किंवा त्याहून अधिक उर्वरित १९ धरणांमधील पाणीसाठा साठा हा पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. खरीप हंगामासाठी पावणेतीन लाख टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवळ भात बियाणे खरेदी करून रोपवाटिका केल्या आहेत.

सोलापूर

पाऊस आणखी लांबल्यास उडीद आणि मूग या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता पाऊस नसल्याने ऊस पिकाला ओढ बसून धोक्यात येऊ लागले आहे उजनीत सध्या उणे २८.३७ टक्के पाणीसाठा, मध्यम प्रकल्पातील पाण्यानेही तळ गाठला आहे विहीर व बोअरवेल पाणी पातळीतही घट टँकरची आवश्‍यकता भासण्याची शक्यता.

बियाणे, खते, कीटकनाशक उपलब्ध; मात्र पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची पाठ उसाच्या एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. बाजारपेठेवरही पावसाबद्दल चिंतेची छाया

कोल्हापूर

नदीकाठची पिके वाळून जाण्याचा धोका जिल्ह्यात दहा टक्के धूळवाफ पेरण्याऊस लागण पूर्ण असून धूळवाफ पेरणी झाली आहे.उसासह भात पिकाला पावसाची गरज कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय काळमावाडी (१.४० टीएमसी) व राधानगरी (१.७५ टीएमसी) धरणांसह इतर प्रकल्पांतील पाणीपातळी घटली.

शिल्लक पाणी पिण्यासाठी वापरणार शेतीसाठी पाणी कपातीचा निर्णय पालेभाज्यांचे वाढलेले भाव वगळता बाजारपेठेवर फारसा परिणाम नाही.

सांगली

पाऊस लांबल्याने दोन लाख ७२ हजार हेक्टरपैकी ४.२ टक्के म्हणजेच १० ते ११ हजार हेक्टरवरच पेरण्या ऊस क्षेत्रालाही झटका बसणार कोयना धरणात (१२ टीएमसी) तर वारणा धरणात (११ टीएमसी) पाणी साठा कमी शेती पाण्यासाठी उपसाबंदीची शक्यता पिण्याचे पाणीही कमी होण्यास सुरुवात कूपनलिकांचे पाणी २५ टक्क्यापर्यंत कमी ज्वारीचे दर काहीसे वाढले भाजीपाला, धान्य दर भडकण्याची शक्यता.

सिंधुदुर्ग

२५ टक्केच पेरण्या, भात पेरणी लांबली. धरणांमध्ये महिनाभर पुरेल एवढा साठा ग्रामीण भागात पाण्याची गैरसोय सुमारे ४० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार.भाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ स्थानिक भाज्यांची आवक घटली.

रत्नागिरी

जिल्ह्यात आतापर्यंत २० टक्के भात पेरण्या. पाच टक्के धूळवाफ पेरण्या अनेक शेतकऱ्यांकडून पेरण्या नाहीत. शीळ, पानवल, हरचिरी या धरणांत दहा दिवस पुरेल एवढा साठा जिल्ह्यात १०५ गावातील १९२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा ४० हजारहून अधिक लोकांना झळा भाज्यांचे भाव कडाडले,आवकही कमी

छत्रपती संभाजीनगर

उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांकडून पेरणी व लागवड मराठवाड्याच्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या ३६.६९ टक्के पाणीसाठा,मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या केवळ १३.२ मिलिमीटर इतकाच पाऊस बियाण्यांची ९ ते १० टक्के विक्री सिंचनाच्या सोयीचा अंदाज घेऊन अत्यल्प प्रमाणात तूर, कपाशी, मिरचीसारख्या पिकाच्या लागवडीस प्राधान्य.

नगर

जिल्ह्यात अद्याप पेरणी नाही. धरणांमुळे मुबलक साठा तरी ३४ गावे आणि १५३ वाड्यांना २६ टँकरने पाणी भंडारदरा, मुळा आणि निळवंडे या तीन धरणांमध्ये १७ टी.एम.सी. पाणीसाठा पावसाअभावी बाजारात शुकशुकाट.

नागपूर

पेरणीला सुरुवातच झाली नसल्याने सध्यातरी दुबार पेरणीची स्थिती नाही. फळबागांना विहिरींतून पाणीपुरवठा विदर्भातील मोठ्या धरणांमधील पाण्याची पातळी खालावली पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर अद्याप परिणाम नाही. जुलै महिनाअखेरपर्यंत हा साठा पुरू शकेल, अशी अपेक्षा. बी-बियाणे, खते व कृषी साहित्याच्या टंचाईची स्थिती सध्या तरी नाही. धान्य बाजारात गहू, तूरडाळ महागली असून गोडेतेलाच्या भावात नरमाई भाजीपाला बाजारात भाज्यांचे भाव चढू लागले असून महागाईचे सावट.

नंदुरबार

बेमोसमी पावसाच्या वेळोवेळी आगमनाने रब्बीतील केळी, गहू, भात, सोयाबिन, ज्वारी, पपई आदी पिकांचे नुकसान खरीप पेरण्या अद्याप झाल्या नसल्याने दुबार पेरणीचे संकट नाही. बेमोसमी पावसामुळे धरणातील जलसाठा ५० टक्केपर्यंत टिकून विहिरी, कूपनलिकांची पातळी घटली. काही ठिकाणी प्रशासनाने खासगी विहिरी-कूपनलिकांचे अधिग्रहण सध्या शेतकऱ्यांची शेती साहित्य व बियाणे खरेदीसाठी गर्दी.

जळगाव

बागायतदारांनी ४५ हजार हेक्टरवर उन्हाळी कापसाची पेरणी केली असून त्याला ठिबकने पाणी वाघूर धरणातून जळगाव शहर ग्रामीणचा काही भाग, जामनेर तालुक्याला अजून सहा महिने पुरेल एवढे पाणी हतनूर, गिरणा धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता. शहरी भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा दुष्काळाच्या भीतीने उलाढाल रोडावली

धुळे

पावसाळा लांबल्याने ओलिताखालील क्षेत्रातील शेतकऱ्यांची ४९ हजार ४०० हेक्टरवर बागायती कापसाची लागवड दुबार पेरणीची जून अखेरपर्यंत शक्यता नाही. टँकरची गरज अद्याप नाही. प्रकल्पांमध्ये एकूण सरासरी २२.५० टक्के जलसाठा उपलब्ध. काहीसे मंदीचे सावट आहे. बियाणे- खत बाजार ठप्प.

मुंबई

सात धरणांत राखीव कोट्यासह सध्या १६ टक्के पाणीसाठा शिल्लक. तो ४८ दिवस पुरेल. पाऊस लांबला तर जूनअखेरपासून १० ते १५ टक्के पाणीकपात लागू होण्याची शक्यता

ठाणे

यंदा पाऊस लांबला असला, तरी १०० टक्के पीक घेण्यात येईल, असा जिल्हा कृषी विभागाचा दावा.पाऊस कमी प्रमाणात झाल्यास हळव्या जातीचे पीक घेण्यात येईल. भातसा धरणामध्ये १०७.६३ मीटर, तानसा धरणात १२१.२८ मीटर, मोडक सागर १४८.८३ मीटर. आणि बारवी धरणाची ६०.८९ मीटर पाणी पातळी शिल्लक ठाणेजिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील ६७ गावे १९० पाड्यांवर ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा

रायगड

यंदा ७० टक्के शेतकऱ्यांनी धूळवाफ्यावर पेरणी केली. डोंगराळ भागातील साधारण ५० टक्के पेरणी तुरळक पावसावर. जिल्ह्यात फक्त पाच टक्के सिंचन क्षेत्र

पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ

जिल्ह्यात ३६४ गावांमधील ९८ हजार ४५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा

उद्योगांना एमआयडीसीद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात

पेरलेले बियाणे वाया जाईल, या भीतीने शेतकऱ्यांकडून बियाण्याची जादा खरेदी

भातासाठी १७ हजार ४५० क्विंटल बियाण्याची गरज आहे.

नवी मुंबई

पनवेल महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाने तळ गाठला असून एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मोरबे धरणात २६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

रोजच्या वापरातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव दहा टक्क्यांनी वाढले ग्रामीण महाराष्ट्रातून फळभाज्या आणि पालेभाज्या कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारात येण्याचे प्रमाण कमी त्याचा परिणाम किरकोळ बाजारपेठेवर

पालघर

जिल्ह्यात भातशेतीचे सुमारे ७५ हजार ६०० हेक्टर क्षेत्र, अद्याप पेरणी नाही.उसगाव व पेल्हार धरणाचा साठा खालावला. वातावरणातील बदलामुळे पिकांवर परिणाम झाल्याने भाज्यांचे भाव ५ ते १० रुपयांनी वाढले. फळेही महागली.

नाशिक

कापसाची ५ टक्के क्षेत्रावर लागवड दुबार पेरणीची शक्यता नाही.४६ गावे आणि ५२ वाड्यांसाठी ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा मनमाडला १५ दिवसांनी तर नांदगावला ५ दिवसाआड पाणीनांदगाव, मालेगाव, देवळा तालुक्यातील ५६ खेड्यांना १६ ते २३ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. नाशिक शहरासाठी १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल यादृष्टीने प्रशासनाची तयारी खत बाजारपेठेत शांतता.

सातारा

मशागतीची कामे पूर्ण; पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या धूळवाफेवरील पेरण्या पावसाअभावी अडचणीत जिल्ह्यात सर्व धरणांत १९.२४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे कोयना धरणात ६.६१ टीएमसी पाणीसाठा असल्याने काटेकोर नियोजन आवश्‍यक.जिल्ह्यात सध्या ३५ टँकरद्वारे ७९ गावे व १७४ वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा माण तालुक्यात सर्वाधिक २० टँकरद्वारे पाणीपाऊस नसल्याने बाजारपेठांतही शांतता खते, बियाणे खरेदी करण्याकडे कल कमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT