shivchatrapati state sports award sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai High Court : आक्षेपांवर निर्णय घ्या! त्यानंतरच शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करा

कोरोनामुळे रखडलेले २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावर नोंदवलेल्या आक्षेपांवर आधी निर्णय घ्या व त्यानंतरच हा पुरस्कार प्रदान करा. तसेच क्रीडा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक घेऊन पुरस्काराबाबत पुनर्विचार करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनामुळे रखडलेले २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराबाबत राज्य शासनाने नुकतेच जाहीर केले आहेत. यात मॅार्डन पेंटाथलॅान या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करूनही पुरस्कार जाहीर करताना डावलले गेल्याचा आरोप करत विराज परदेशी यांच्यासह काही खेळाडूंनी क्रीडा विभागाकडे आक्षेप नोंदवला होता.

मात्र त्यावर कोणताही निर्णय न घेण्यात आला नाही. पुरस्कारार्थींची यादी निश्‍चित करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात यावी. पुरस्काराबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी करणारी याचिका परदेशी यांनी ॲड. संजय क्षीरसागर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोस पुनावाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता. २३) सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी नोंदवलेला आक्षेप व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यावर नियमानुसार निर्णय घ्यावा. त्यानंतरच यंदाचा हा पुरस्कार वितरित करावा, असा आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिला आहे.

कबड्डीपटू विराज लांडगे व मल्लखांब खेळाडू ऋषिकेश अरणकल्ले यांनीही या पुरस्कारावर आक्षेप घेत याचिका केलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी करूनही पुरस्कार दिला जात नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. ॲड. वैभव उगले यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली.

संघटनेला डावलले जात असल्याचा आरोप :

शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बाबतीत महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेला सातत्याने डावलण्यात येत आहे. गुणवत्ता असूनही आमचा पुरस्कारासाठी विचार केला जात नसल्याची तक्रार विविध खेळातील खेळाडूंनी केली. या संदर्भात संघटनेचे सचिव नामदेव शिरगांवकर यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना पत्र लिहल्याची माहिती खेळाडूंनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत दिली होती.

पुरस्कारासाठी गेल्या तीन वर्षातील कामगिरी लक्षात घेतली जाते. मात्र या काळात कोरोना होता. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन देशभरात या वर्षासाठी सर्वांना सवलत देण्यात आली. आम्हाला सवलत का मिळत नाही, असा प्रश्‍न परदेशी यांनी उपस्थित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा

Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Latest Marathi News Updates live: ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT