छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आज शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र या गडावर भगवा ध्वज नाही, अशी खंत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. तसंच कायमस्वरुपी भगवा ध्वज न लावल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. .
राज्यभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त विविध शासकीय कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. शिवनेरी गडावर मुख्यमतंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवजन्म सोहळा साजरा कऱण्यात आला. मात्र या शासकीय कार्यक्रमावर खासदार कोल्हे यांनी बहिष्कार टाकला आहे.
शिवनेरी गडावर भगवा ध्वज नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. कोल्हे गडाच्या मध्यावर आंदोलन करत आहेत. शासकीय कार्यक्रमानंतर शिवभक्तांसोबत ते शिवनेरी चढून पुढचे तीन तास शिवनेरीच्या पायथ्याजवळ बसणार आहेत. पुढच्या शिवजयंतीला शिवनेरीवर भगवा फडकला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरकार कलम ३७० हटवू शकते, तर पुरातत्व खात्याच्या नियमामध्ये छोटासा बदल करून भगवा का फडकवू शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. योग्य ती खबरदारी घेऊन केंद्र शासनाकडून लवकरात लवकर परवानगी मिळवावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.