Shivrajyabhishek din 2023 
महाराष्ट्र बातम्या

Shivrajyabhishek din 2023: रायगडावरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

धनश्री ओतारी

स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज तारखेनूसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक साेहळा माेठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला किल्ले रायगडाच्या इतिहासातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहावयास मिळाली. दरम्यान, सोहळा संपन्न झाल्यानंतर मोठी गर्दी गडावरुन उतरण्यासाठी झाली असता पोलिसांनी लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. (Shivrajyabhishek din 2023 Police baton charge to disperse crowd at Raigad)

सोहळा संपन्न झाल्यानंतर नाणे दरवाजाच्या मार्गाने शिवभक्त खाली जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे गडावर मोठी गर्दी झाली. खाली उतरण्याच्या मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मार्गावरील गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. अशी माहिती टी व्ही ९ वृत्तसंस्थेने दिली आहे. (Latest Marathi News)

गेल्या अर्धातासांपासून संभाजीराजे छत्रपती शिवभक्तांना आव्हान करत आहेत. शिस्तिचं पालन करा. मात्र, शिवभक्तांनी त्यांचे आव्हान धुडकावून लावले. यामुळेचं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. (Latest Marathi News)

सोहळ्यापूर्वीही, संभाजीराजेंनी एक ट्विट करत शिवप्रेमींनी गड चढण्याची गडबड करुन नये असे आवाहन केले होते. तसेच, सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही संभाजीराजेंनी शिवप्रेमींना केले आहे.

महाड ते रायगड रोड वर वाहनांची प्रचंड कोंडी

किल्ले रायगडवर एक लाखापेक्षा अधिक शिवभक्त दाखल झाले आहेत. तितकीच गर्दी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी झाल्याने मध्य रात्री शिवप्रेमींसाठी गडावर प्रवेश बंद करण्यात आला होता.

किल्ले रायगडकडे जाणारे दोन्ही मार्ग पूर्णपणे ठप्प झाली हाेती. महाड ते रायगड रोड वर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. ढालघर मार्गे देखील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रायगडाकडे जाणारी वाहतूक थांबवली गेली. अनेक शिवप्रेमींची वाहने परतीच्या मार्गावर गेली. त्यामुळे आजच्या सोहळ्यास उपस्थित राहता येत नसल्याने शिवप्रेमींत नाराजीचा सूर पसरला होता. (Latest Marathi News)

या सर्व घडमाेडी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या कानावर पडल्या. त्यानंतर शिवप्रेमींना किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेता यावे त्यांना अभिवादन करता यावे यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेत जिल्हा प्रशासनासमवेत बैठक घेतली होती. (Latest Marathi News)

या बैठकीनंतर संभाजीराजेंनी एक ट्विट करत शिवप्रेमींनी गड चढण्याची गडबड करुन नये असे आवाहन केले होते.

सध्या गडावर असलेले लोक ९ - १० च्या दरम्यान गड उतरतील, तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. असेही संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT