Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

..म्हणून अपात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळलं!

सकाळ डिजिटल टीम

व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडं तक्रार केलीय.

Maharashtra Politics : व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडं तक्रार केलीय. यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव वगळून इतर 14 जणांची तक्रार करण्यात आलीय. काल झालेल्या बहुमत चाचणीच्या वेळी या आमदारांनी व्हिपचं पालन केलं नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

शिवसेनेच्या (Shiv Sena) 15 आमदारांनी काल झालेल्या बहुमताच्या चाचणीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं नाही. या 15 आमदारांमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचाही समावेश आहे. पण, गोगावले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्यांचं नाव वगळण्यात आलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आल्याचं गोगावले यांनी सांगितलं. शिवसेनेच्या या 14 आमदारांना आता व्हीपचं पालन न केल्यानं नोटीस देण्यात आलीय. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई आता कायदेशीर मार्गावर पोहोचली आहे. काल झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकार पास झालंय.

दरम्यान, अजय चौधरी यांची गटनेतापदाची निवड रद्द केल्याच्या विरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेणार असल्याचं कळतंय. अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही, असं शिवसेनेनं म्हटलंय. गेल्या आठवड्यात वडिलांचं (Uddhav Thackeray) सरकार पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या विरोधात मतदान करून आदित्य ठाकरे यांनी त्या व्हिपचा अवमान केला. आदित्य ठाकरे यांना अपात्रतेला सामोरं जावं लागू शकतं. परंतु, पुढील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहावं, अशी टीम ठाकरेंची अपेक्षा आहे. पक्षाच्या नव्या व्हिपला मान्यता देण्याच्या नव्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या टीम ठाकरेंच्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे.

शिंदे आणि अन्य 15 आमदारांना टीम ठाकरे यांनी अपात्र ठरवण्याचा निर्णय कोर्टाला घ्यायचा असताना सभापती व्हिप ओळखू शकत नाहीत, असं याचिकेत नमूद करण्यात आलंय. अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनीही एकनाथ शिंदे यांना पुन्हा विधानसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिली. दोन आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात बंड केल्यावर त्यांना विधानसभेतील शिवसेना नेतेपदावरून हटवण्यात आलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे सरकार पाडलं. त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्यांनी भाजपच्या मदतीनं महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन केलं. अल्पमतात आल्यानंतर, जेव्हा उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं. यानंतर राज्यपालांच्या या आदेशाविरोधात उद्धव गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सर्वोच्च न्यायालयानं फ्लोअर टेस्टला (Floor Test Maharashtra) स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT