Shivsena esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: ठाकरे-शिंदे संघर्षात आणखी एक नाव गोठवलं जाणार?

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन पर्याय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तर निवडणूक आयोगाकडे शिल्लक असलेल्या चिन्हांच्या यादीत ही चिन्हे नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोरील पेच आणखी वाढला आहे.

तर अजून ही शिंदे गटाकडून कोणतीही नावे किवा चिन्ह देण्यात आली नाहीत. तर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे नावे दिली असल्याचे समजते. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तिन नावे देण्यात आली आहेत.

दरम्यान आता शिंदे गट देखील 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' या नावाची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगासमोर नवा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे आता हे नाव कोणाला मिळणार या कडे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला सोमवार पर्यंत 3 नवी चिन्हं आणि 3 नव्या नावांचा प्रस्ताव देण्यासाठी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Office: फडणवीस यांच्या कार्यालयात अज्ञात महिलेकडून तोडफोड; मंत्रालयात नेमकं काय घडलं?

'बांगलादेशात जे घडतंय, ते आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही'; गोविंद गिरी महाराजांनी हिंदू समाजाला केलं सावध

आयुष्यात 'या' 3 गोष्टी घडत असताना पाळा मौन, अन्यथा मिळतील नकारात्मक परिणाम

Latest Maharashtra News Updates : तेलंगणाच्या मंत्र्याच्या घरी ईडीची धाड

Stock Market: शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDLने केला मोठा बदल, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू

SCROLL FOR NEXT