ShivSena Bhavan : सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यात राजकीय सामना रंगला आहे. नारायण राणे यांना अटक करुन सत्ताधाऱ्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांचा रोष ओढावल्याचं बोललं जात आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रोषाचं वातावरण आहे. यातूनच शिवसेना विरोधकांनी खोडसळपणा करत थेट शिवसेना भवनाचा पत्ता बदलला आहे.
सोशल मीडियावर नेटकरी एखाद्याला ट्रोल करण्यासाठी कोणता फंडा वापरतील याचा काही नेम नसतो. तसाच काहीसा प्रकार शिवसेनेच्याबाबतीत घडला आहे. Wikipedia वरील शिवसेना भवनाचा पत्ता कुणीतरी बदलत खोडसळपणा केला आहे. Wikipedia वर शिवसेना भवन इटलीत असल्याचं दाखवण्यात आलं. मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथे असणारे शिवसेना भवन इटलीमध्ये असल्याचं Wikipedia एडिट करण्यात आलं. Wikipedia पब्लिक डोमेन असल्यामुळे तेथील माहिती कुणालाही बदल करण्याचे आधिकार आहेत. याचाच फायदा घेत विरोधकांनी शिवसेनेच्या मर्मावर बोट ठेवत शिवसेना भवन इटलीत असल्याचं दाखवलं.
शिवसेना भवनचा पत्ता इटलीमध्ये असल्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर Wikipedia वरील माहिती पुन्हा एडिट करण्यात आली आहे. सध्या शिवसेना भवनाचा योग्य तो पत्ता Wikipedia वर दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.