Politics 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेची दमछाक करण्याची भाजपची रणनीती

सकाळ न्यूज नेटवर्क

फडणवीस-शहा भेटीनंतर भाजपची भूमिका बदलली
नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असताना आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही ताणून धरण्याचे ठरविले आहे. शिवसेनेने अनुकूलता दर्शविल्यानंतरच बोलणी होतील, असा पवित्रा भाजपने घेतला असून, याद्वारे शिवसेनेची दमछाक करण्याची या पक्षाची रणनीती आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाल्याचे पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे प्रभारी सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. शिवसेनेचे दावे, राज्यातील बदललेली राजकीय स्थिती, याबाबत मुख्यमंत्र्यांना नेतृत्वाकडून ‘योग्य तो संदेश’ आज देण्यात आला.

ज्या आकडेवारीचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे, त्यात फारसा दम नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या पर्यायामधील फोलपणा लक्षात आल्यानंतर शिवसेना चर्चेला सुरवात करेल, असा भाजपचा होरा आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फार घाई करण्याची आणि दबावाला बळी पडण्याची गरज नाही. अवास्तव अटी घालून शिवसेनेने बोलणी बंद केली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अनुकूलता दाखविल्यानंतरच पुढे चर्चा करावी, असे भाजपने ठरविल्याचे समजते.

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जो घोळ सुरू आहे तो पाहता पक्षनेतृत्वाने खंबीर राहण्याची आणि वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेने चर्चेची दारे बंद केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या प्रतिसादानंतरच बोलणी सुरू करता येतील. अर्थात, त्यासाठीही शिवसेना नेतृत्वाकडून हमी मिळावी, अशीही भाजपची अट आहे.

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Sanjay Raut : भाजप एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता पण करणार नाही , संजय राऊत यांचा खोचक टोला

SCROLL FOR NEXT