शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरसुद्धा निशाणा साधला. राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांवर उद्धव ठाकरेंनी टीकेचे बाण सोडले. यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माफीनाफ्याबाबत वक्तव्य करणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही टीकास्र सोडले. देशातील बंदरांच्या सीएसआरमधील ७५ टक्के निधी मोदी सरकारने गुजरातकडे वळवला, ही माहिती अधिकारातून मिळालेली माहिती सांगताना ‘वाचा आणि थंड बसा’ या ‘मार्मिक’च्या घोषवाक्याने त्यांनी शिवसैनिकांना डिवचले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार असं म्हणत यांना फक्त वसुली आणि वाझे माहिती असल्याची टीका भातखळकर यांनी केली. तसंच गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून विकून तिजोरी भरली असती आणि थोडे तुम्हाला पाठवले असते असा टोला लगावला आहे.
राजनाथ सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना भातखळकरांनी म्हटलं की, सोनिया मातोश्रींचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी हा किती मोठा विनोद. अहो ते जिंकून आलेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने CM थोडेच झालेत.
उद्धव ठाकरेंनी केंद्रातील सत्तेपासून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपपर्यंत सर्वांचा पुरेपूर समाचार घेतला. आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राकडे आहेत. रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड होता कामा नये, असा थेट इशाराही ठाकरे यांनी केला. तसंच राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले की, आपल्याला सावरकर-गांधी कळले आहेत का, तेवढी आपली लायकी आहे का, असे वाद उकरणाऱ्यांनी देशासाठी काय केले, असे त्या दोघांनी विचारले तर आपण काय सांगणार? स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, आंदोलनात भाग नाही... फक्त भारतमाता की जय, वंदे मातरम, अशी घोषणा दिली की काम झाले, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.