bavankule Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गट बुलढाण्यातून हद्दपार? बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर चर्चा

दत्ता लवांडे

बुलढाणा : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या निवडणुकीत बुलढाण्यातील खासदार आणि सर्व आमदार हे भाजपचे असतील असं वक्तव्य केलं आहे. पण सध्या शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या खासदारांपैकी प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे आहेत. बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी काय करावे हा पेच निर्माण झाला असून यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाने उत्तर देत आव्हान केलं आहे.

"बुलढाण्यातील लोकसभेचा खासदार आपल्याला भाजपकडून मोदीजींना निवडून द्यायचा आहे." असं बावनकुळे म्हणाले. त्यानंतर, ओघाओघाने ते बोलून गेले असतील, शिवसेना भाजपचा उमेदवार येथे असेल असं त्यांना बोलायचं असेल, पण ते जाणून बुजून बोलले असतील तर भविष्यात असा प्रकार परत घडू नये आणि अशी भाषा वापरू नये अशी विनंती शिंदे गटाने केली आहे. त्याचबरोबर शिवेसनेच्या प्रतापराव जाधवांना बुलढाण्यातून तिकीट नाही मिळालं तर त्यांना दुसरीकडे अॅडजस्ट करू असं मत भाजपच्या रामदास तडस यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, बुलढाण्यात सध्या विधानसभेच्या ७ जागा आहेत. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत शिवसेचे तीन आणि भाजपचे चार आमदार बुलढाण्यातून निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाड, शशिकांत खेडेकर आणि संजय रायमूलकर यांचा सामावेश असून भाजपच्या चैनसुख संचेती, आकाश फुंडकर, संजय कुटे आणि श्वेता महाले यांचा सामावेश आहे. बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता बुलढाण्यातील असेलेल्या तीनही आमदारांना तिकीट मिळणार की डावललं जाणार याबाबत संभ्रम आहे.

बुलढाणा लोकसभेवर मागच्या वीस वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व असून आनंदराव अडसूळ आणि प्रतापराव जाधवांनी तेथील राजकीय गड संभाळला आहे. पण बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर भाजप शिंदे गटाला बुलढाण्यातूल हद्दपार करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT