आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्व राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. आपापल्या मतदारसंघात हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर जागा वाटपासंबधी बैठका, चर्चा होणार असल्याचे संकेत अनेकदा नेत्यांनी बोलताना दिले आहेत. मात्र, त्याआधीच शिवसेना शिंदे गटातील काही खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे उच्चपदस्थ सूत्राने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. ५ पैकी ३ राज्यांमध्ये भाजपने बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. हीच बाब लक्षात घेता शिंदे गटातील खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्ह अधिक प्रभावी ठरेल, असं शिवसेना (शिंदे गटातील) काही खासदारांचं मत आहे. त्यामुळे आम्हाला कमळ चिन्हावरच निवडणूक लढू द्या, अशी विनंती त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
तर शिवसेना (शिंदे गटाच्या) खासदारांची ही मागणी भाजपला मान्य नसल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांनी हवाल्याने दिली आहे. त्याउलट शिंदे गटातील खासदारांनी भाजपलच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली, तर त्याचा ठाकरे गटाला जास्त फायदा होईल, असं भाजपचं मत आहे. त्यामुळे भाजपने शिंदे गटाच्या या मागणीला नकार दिल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना १८ पैकी १३ खासदारांनी पाठिंबा दिला. या सर्व खासदारांना आता लोकसभा निवडणुकीत भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिंदे गटाची भूमिका असल्याची माहिती आहे. मात्र, भाजपने याला विरोध केला असून निवडणुकीत सर्व जागा सोडण्यासही नकार दिल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.