Imtiyaz Jaleel - Rupali Thombare Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"आणखी किती जलील होणार..."; रुपाली ठोंबरेंचा निशाणा

मराठी पाट्यांच्या निर्णयावर खासदार जलील यांनी टीका केली होती.

सुधीर काकडे

राज्यातील सर्व दुकानांवरील नाम फलक मराठीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दूल मुस्लमिनचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या मुद्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली होती. त्यावर आता नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली ठोंबरे यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जलील यांना मराठी पाट्यांची काय ऍलर्जी आहे ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तिखट शब्दांत टीके केली आहे.

जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता हे मुद्दे काढता, ही नौटंकी असल्याचं न समजायला लोक मुर्ख नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. त्याला उत्तर देताना रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, "महाराष्ट्रात दुकानावर मराठी पाट्याची इम्तियाज जलील यांना काय ऍलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार ?"

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, आपण ज्या राज्यात राहतो, ज्या मातीमध्ये खातो तिचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. इम्तियाज जलील असो किंवा व्यापारी असो त्यांनी अशी वक्तव्य करणं म्हणजे बेईमानी असल्याचं देखील ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT