शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. या निकालानुसार शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचे सिद्ध झाले आहे.शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. दरम्यान यानंतर आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. (Uddhav Thackeray Faction MLAs Disqualification News)
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयातील वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेचा कुठलाही आमदार या क्षणी अपात्र झाला नाही. राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाने मान्य केलेली घटना ग्राह्य धरत शिवसेना एकनाथ शिंदे यांची हे मान्य केली आहे.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल, पण अपात्र कोणीच नसल्यामुळ ते कोर्टात काय म्हणतील? पण व्हीप भरत गोगावले यांचा मान्य केल्यामुळ सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या निर्णयाला लँडमार्क म्हणता येणार नाही, असेही सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे (UBT) आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
नेमकं काय झालं?
सर्वांचे लक्ष लागलेला हा निकाल सुनावताना नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यांनी ठाकरे आणि शिंदे गट यापैकी गटातील आमदारांना अपात्र केलंलं नाही. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे. नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा व्हिप वैध ठरवला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण १४ आमदार राहीले आहेत.
दरम्यान ठाकरे गटाने नार्वेकरांनी दिलेल्या या निर्णयाला विरोध केला आहे. ठाकरे गट याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.