Shivsena MLA Tanaji Sawant Disappoint on NCP e sakal
महाराष्ट्र बातम्या

'...तर आईचं दूध आठवेल', शिवसेना आमदाराची राष्ट्रवादीवर उघड नाराजी

सकाळ डिजिटल टीम

Shivsena MLA Tanaji Sawant Disappoint on NCP : मुंबई : महाविकास आघाडीत निधीवरून खदखद कायम आहे. आज शिवसेना आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी निधी वाटपावरून उघड नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. आमच्यामुळे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसताय आणि आमच्या पक्षाची घडी मोडण्याचा प्रयत्न करताय. पण, आम्ही फक्त साहेबांच्या आदेशाची वाट बघतोय, असा इशारा तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला (NCP) दिला आहे.

''गेल्या २०१९ पासून आजपर्यंत तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एकही भूमिका घेतली नाही. पक्षाला खाली कसं आणायचं? हे दुसऱ्या पक्षातील लोक बघतात. तुम्ही आमचं वाकून कशाला बघतात. तुम्ही तुमचं बघा. आमच्याकडे मागून काही मिळत नाही. आमच्याकडे उद्धव ठाकरेंचा आदेश चालतो. आम्ही शिवसैनिक आदेशाची वाट पाहतो. आम्ही आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवय नव्हती. कडवा शिवैसनिक हा विस्थापितांचा गट आहे. त्याच्या मनगटातील रग वेगळाच आहे. कुठल्याही पक्षाने त्याला आजमविण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या वेळी आजमवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना काय मिळालं हे माहिती आहे'', असं तानाजी सावंत म्हणाले.

निधी वाटपावरून नाराजी -

काही दिवसांपूर्वी अधिवेशन पार पडलं. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते. अर्थसंकल्पामधून देखील हेच दिसून येते. ५७ टक्के बजेट हे राष्ट्रवादीला दिलं जातं. ३०-३५ टक्के बजेट काँग्रेसला, तर शिवसेनेला १६ टक्के बजेट जातं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमचे असल्यामुळे ६ टक्के हे पगारांवर जातं. मग विकासासाठी किती बजेट आहे? फक्त १० टक्के? असा सवाल देखील तानाजी सावंत यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे ग्रामपंचायतचे सदस्य देखील हसन मुश्रीफ यांच्याकडे जातात आणि निधी आणून आपल्या छाताडावर येऊन नाचतात. जो निधी आमच्या आमदाराला मिळत नाही. या सरकारमध्ये शिवसेनेसाठी काय आहे? आमच्यामुळे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांड लावून बसता आणि आमची घडी विस्कटण्याचा प्रयत्न करताय. आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय. आमच्या संयमाची तुम्ही परीक्षा करू नका. साहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसतोय. पक्षात आम्हाला यांच्याकडे बघाव लागतं आणि हे गालातल्या गालात हसत आमची चेष्टा करतात. आम्ही या दोन्ही पक्षावर प्रचंड नाराजी आहे, अशी उघड नाराजी तानाजी सावंत यांनी बोलून दाखवली.

...तर आईचं दूध आठवेल, राष्ट्रवादीला इशारा -

बुलडाण्याच्या विधान परिषद निवडणुकीत सेनेचा उमेदवार दिला. अनिल देशमुखांच्या नातेवाईकाला निवडून आणले आणि सेनेचा अधिकृत उमेदवार पाडला. आम्ही पहिल्या झटक्याला काही करायचं नाही म्हणून अपमान पचवला. खेड तालुका पंचायत येथील सभापतीला मारहाण करून राष्ट्रवादीत घेतले आणि राष्ट्रवादीचा सभापती म्हणून घोषित केले. अहमदनगरचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले. आवाज उठविल्यानंतर परत शिवसेनेत पाठविण्याचा प्रयत्न केले. तुम्ही सत्तेच बसण्याचे स्वप्न पाहिले होते का? आमच्या पक्षप्रमुखाच्या आदेशामुळं तुम्हाला सत्तेचं तोंड पाहायला मिळतंय. ज्यांनी सत्तेत बसवलं त्यांच्यावर तुम्ही इतका अन्याय करताय. ते आम्ही कसं काय सहन करायचं? तुमचं आम्ही घेणार नाही आम्ही तुमचं घेणार नाही हे ठरलं असताना हे पक्ष असं का वागतात? आम्ही जोपर्यंत शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत. आमच्या नादाला लागू नका. आम्ही कोणावर वार करत नाही. पण, आमच्यावर वार केला आणि शिवसैनिकाची एक दणकट बसली तर आईचं दूध आठवेल, असा इशारा देखील तानाजी सावंत यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT