मुंबई : शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या नव्या आघाडीला महाशिवआघाडीऐवजी महाविकासआघाडी असे नाव देण्यात येणार आहे.
शिवसेनेतील शिव हा शब्द घेऊन महाआघाडीऐवजी महाशिवआघाडी असे याचे नामकरण करण्यात आले होते. पण, दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत महाविकासआघाडी असे याचे नामकरण करण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षाच्या मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतल्या बैठकीत यावर खलबतं करण्यात आली. याविषयी अंतिम निर्णय उद्या (शुक्रवार) मुंबईत होणाऱ्या तिन्ही पक्षाच्या बैठकीत होईल.
या तिन्ही पक्षांकडून किमान समान कार्यक्रम राज्यात चालविण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमधील 2-2 सदस्य यामध्ये असतील. आता उद्या शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सर्वकाही स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.