Eknath Shinde Ajit Pawar Maharashtra Politics Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: बंडाचं बिहार मॉडेल; उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पायाखालची जमीन सरकवणारा हा कोणता पॅटर्न?

राजकारणात बंडाचा इतिहास देशाला नवा नाही. पण या बंडाचं हे कसलं स्वरुप आहे, ज्यामध्ये बंडखोर थेट पक्षावरच दावा साधत आहेत. बंडासोबत हा लढा थेट पक्ष आणि चिन्हावर जाऊ लागला आहे.

वैष्णवी कारंजकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत, कोणताही गट म्हणून नाही, असं अजित पवार यांनी शपथविधीनंतर स्पष्ट केलं. यानंतर शरद पवारांनी बंडखोरांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारमध्ये सामील होणाऱ्या निर्णयाला बंड म्हटलं आहे तर अजित पवारांनी याला पक्षाची भूमिका म्हटलं आहे. या काका पुतण्याच्या विधानांवरुन हे स्पष्ट झालं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसही त्याच चक्रव्यूहात अडकली आहे, ज्यामध्ये एका वर्षांपूर्वी शिवसेना अडकली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा मिळवण्याची ही लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन हटवलं असून ती जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.

शरद पवारांसमोर आता आपणच तयार केलेल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह वाचवण्याचं आव्हान आहे. राजकारणात बंडाचा इतिहास देशाला नवा नाही. पण या बंडाचं हे कसलं स्वरुप आहे, ज्यामध्ये बंडखोर थेट पक्षावरच दावा साधत आहेत. बंडासोबत हा लढा थेट पक्ष आणि चिन्हावर जाऊ लागला आहे. आधी शिवसेनेमध्ये असं झालं होतं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही असंच काही होऊ पाहत आहे. बंडाचं हे नवं मॉडेल बिहारमधून आल्याचं सांगितलं जातं.

काय आहे बंडखोरीचं बिहार मॉडेल?

बंडखोरीनंतर थेट पक्षावर दावा करण्याची परंपरा बिहारमधून सुरू झाली होती. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी २०१९मध्ये आपला राजकीय वारसा मुलगा चिराग पासवान याच्याकडे दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि यात चिराग पासवान यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव पारित झाला. रामविलास यांनी पक्षाची कमान आपला मुलगा चिरागकडे सोपवली.

रामविलास यांच्या निधनानंतर काही काळ पक्षात सर्वकाही ठीक चाललं होतं. पण जून २०२१ मध्ये काका पशुपती पारस यांनी आपला पुतण्या चिराग याच्या विरोधात बंड केलं. पशुपती पारस यांनी पुढे पक्षाच्या विविध पदांवरुन चिरागला हटवलं आणि स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केलं.

काकांबरोबर जुळवून घेण्याचा चिराग यांनी खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रकरण निवडणूक आय़ोगापर्यंत गेलं. चिराग आणि पशुपती पारस दोघांनीही पक्ष आणि चिन्ह यांच्यावर दावा केला. त्यानंतर आयोगाने कोणालाही हे नाव, चिन्ह वापरता येणार नाही, असा आदेश दिला. जेव्हा निवडणूक आयोगाचा निर्ण आला, तेव्हा रामविलास यांनी बनवलेल्या लोक जनशक्ती पक्षाचं नाव आणि चिन्ह पशुपती पारस यांच्याकडे गेलं होतं. त्यामुळे त्यानंतर चिराग यांनी आपल्या वडिलांच्या नावाने लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) असा एक नवा गट बनवला.

एकनाथ शिंदेंचाही हाच पॅटर्न होता

शिवसेनेत बंड केल्यावर एकनाथ शिंदेंनीही बिहारच्या याच मॉडेलचा उपयोग केला. एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत पक्षाचे बहुतांश महत्त्वाचे आणि मोठे नेते गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपासोबत राहून महाराष्ट्रात सरकार तयार केलं आणि आपणच शिवसेना असल्याचा दावा करायला सुरुवात केली. पुढे प्रकरण निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयात गेलं. दीर्घकाळ चाललेल्या या कोर्टाच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदेंचा विजय झाला आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंच्या पदरी पडलं. उद्धव ठाकरे आपल्याच वडिलांनी स्थापन केलेला पक्ष गमावून बसले. चिराग यांच्या प्रमाणेच त्यांनीही आपल्या वडिलांच्या नावे नवा पक्ष बनवला – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

२०२१ मध्ये पशुपती पारस, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि आता २०२३ मध्ये अजित पवार. फक्त महिने वेगळे असले तरी पॅटर्न सर्वांचा सारखाच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना प्रवेशानंतर जयश्री जाधवांचं सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, 'त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही'

Pune Fire: पुण्यात पार्किंगवरुन वाद; माजी सैनिकाने झाडली गोळी; नेमकं काय घडलं?

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

SCROLL FOR NEXT