EKnath shinde uddhav thackery esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: खरी शिवसेना कोणाची? विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग! पक्षफुटीनंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच येणार आमनेसामने

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ आज पाठवणार नोटीस

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला आता वेग आल्याचे दिसून येत आहेत. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रकही ठरलं आहे. आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार असल्याची माहिती विधीमंडळ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यात सत्तांतर होऊन एक वर्ष पुर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आत्तापर्यंत प्रत्यक्षात आमनेसामने आलेले नाहीत. विधीमंडळाच्या कार्यवाहीनिमीत्त ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तर ते एकमेंकासमोर आल्यानंतर काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुरावे सादर करताना शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जुलै 2022 मध्ये नेमकी शिवसेनेची सुत्रे कोणाच्या हातात होती? हे तपासले जाणार आहे. यासंबधीचे वृत्त टसाम टिव्ही'ने विधीमंडळ सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक

13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान चालणार युक्तिवाद

23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात होणार अंतिम सुनावणी

13 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही? यावर सुनावणी पार पडेल

20 ऑक्टोबरला सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय.

13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल.

20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल.

याशिवाय 20 ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्र एखाद्या गटाला सादर करायची असतील, तर त्यासाठी संधी दिली जाईल.

27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं (स्टेटमेंट) मांडतील.

6 नोव्हेंबर पर्यंत दोन्ही गट आपापले मुद्देसूद मांडणी करतील व दावे आणि प्रतिदावे करतील.

10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडेल.

20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल.

23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल.

सर्व पुरावे तपासल्या नंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT