ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (shivsena mla pratap sarnaik) यांच्या छाबय्या विहंग गार्डनवर लावलेल्या दंड माफी प्रकरणी मुख्यमंत्री राज्यातील जनतेची फसवणूक करत आहेत. 2012 मध्ये प्रताप सरनाईक यांचे बांधकाम तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यावेळी अजित पवार उपमुख्यमंत्री आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ची सेना माफिया सेना झाली असून कोविड(Covid)चा काळ म्हणजे कमाईचा काळ असं त्यांना वाटतं होतं, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya)यांनी केला आहे.
माफिया सेनेला धडा शिकवणार
कोविड काळात कोणत्या कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, त्यात कोणी किती कमावले हे जनतेसमोर येवू द्या, असं आव्हानही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. मात्र त्यांच्यात हिंमत नाही, हे काम आपण करणार असून माफिया सेनेला धडा शिकवणार, असंही ते म्हणाले. दरम्यान 6 महिन्याच्या आत सरनाईकांना पैसे भरायचे होते असे नोट्समध्ये म्हटले आहे. 18 कोटी 10 लाख प्रताप सरनाईक यांना भरावे लागणार. यावर मी उच्च न्यायालयात जाणार आहे असे सोमय्या म्हणाले.
18 कोटी 10 लाख भरावेच लागणार.
ठाणे महानगर पालिकेने आम्ही नोटीस देणार असे कबूल केले होते. त्यांनी पैसे भरले नाहीत तर संपत्ती जप्त करून रक्कम वसूल करावी असे नोट्समध्ये म्हटले होते. नोटीस निघाली तर फौजदारी कारवाई करावी लागणार. त्यामुळे प्रताप सरनाईक यांची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे आम्ही या विरोधात आता तक्रार दाखल करणार. कॅबिनेटच्या नोटमध्ये म्हटलं होतं की, व्याजासह भरावे लागणार. गैर कायदेशीर बांधकाम करायचे लोकांना सांगायचे नाही. राष्ट्रवादीचे नेते नजीम मुल्ला यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण त्यावेळी बाहेर आले होते. पण आता 'तेरी भी चूप मेरी भी चूप सुरू आहे.
अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
काय आहे प्रकरण?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 1 येथे उभारलेल्या छाबय्या विहंग गार्डन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण ठाणे महानगरपालिकेने 2008 मध्ये या कंपनीला दंड ठोठावला होता. आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन दंड माफ केलाय. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीच्या दंड माफ प्रकरणावरुन भाजप आक्रमक झालीय. सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीचा दंड माफ करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने विरोध केला होता तरीही राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला. त्यामुळे या विरोधात आज ठाण्यात भाजप कडून आंदोलन केलं गेलं.
अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.