Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : "नाव व चिन्ह मिळवण्यासाठी २००० कोटींचा सौदा"; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हा फक्त प्राथमिक आकडा आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या या निर्णय़ावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच संजय राऊतांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं."

यासोबतच त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. "ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली", अशा या ओळी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT