‘ठाकरे-राऊत’ मॅच फिक्सिंग होती तर मग ठाकरे इस्पितळात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या, त्या फिक्सिंगला कोणते नाव द्यायचे? हे सर्व पाहिले की वाटते, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार महाराष्ट्रात अवतरले आहे असा आरोप सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर करण्यात आला आहे.(Saamana editorial Devendra Fadanvis Uddhav Thackery interview)
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रसिद्ध करण्यात आली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्या टीकेला सेनेने अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलं आहे?
फडणवीस व त्यांच्या सरकारला नैतिकतेचे कितीही प्रवचन झोडू द्या, खरे काय ते लोकांना माहीत आहे. ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीचा भूकंप म्हणजे मॅच फिक्सिंग असा आरोप करणारे फडणवीस हे काही ‘श्रीमान सत्यवादी’ नाहीत. आम्ही फडणवीसांच्या वक्तव्याची दखल घेतली. कारण ज्यांच्यावर किमान बोलावे व लिहावे असे ते व्यक्तिमत्त्व आहे. बाकी सगळे पादरे पावटेच आहेत. फडणवीस म्हणतात, ठाकऱ्यांची मुलाखत वाचनीय नाही. याचा सरळ अर्थ असा की, अस्सल मराठमोळा ठेचा असलेल्या या मुलाखतीने त्यांना ठसका लागला, जळजळ झाली. त्याला कोणी काय करायचे? असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय वादळानंतर एक मुलाखत काय दिली, राज्यात जणू भूकंपाचे हादरेच बसले. ठाकरे यांच्या मुलाखतीवर क्रिया-प्रतिक्रिया सुरू झाल्या. समस्त शिवसेना विरोधक एकजुटीची वज्रमूठ आवळून बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत. एका मुलाखतीत इतकी ताकद असते हे यानिमित्ताने महाराष्ट्राला कळले.
दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खास पत्रकार परिषद घेऊन ‘ठाकरे-राऊत’ मुलाखतीवर खुलासे व हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ नामाचे महत्त्व अधोरेखित करणारे हे दृश्य आहे. ठाकरे यांनी मुलाखतीत त्यांची भूमिका व बाजू मांडली. घरातल्याच लोकांनी आपल्याबाबतीत कशी दगाबाजी केली याबद्दल मन मोकळे केले. इस्पितळातील अतिदक्षता विभागात झुंज सुरू असताना बाहेर सरकार उलथवून टाकण्यासाठी कसे ‘अघोरी’ प्रकार सुरू होते, त्यावर ठाकरे बोलले व तेच खरे फडणवीसांच्या संतापाचे कारण आहे.
‘ठाकरे-राऊत’ मॅच फिक्सिंग होती तर मग ठाकरे इस्पितळात असताना बाहेर सरकार पाडण्याच्या निर्घृण हालचाली सुरू होत्या, त्या फिक्सिंगला कोणते नाव द्यायचे? हे सर्व पाहिले की वाटते, प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार महाराष्ट्रात अवतरले आहे व महाराष्ट्राची अवस्था हे भकास करणार आहेत. असा गंभीर आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.