नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांनी इमारतीच्या आवारात घुसून राणांना आव्हान दिलं. यानंतर तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे
"कोणाच्यातरी पाठबळात तुम्ही मुंबईत येऊन आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्थ बसतील का? कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी तुम्हा आम्हाला सांगू नका, ते काय आहे सरकारने काय कराव हे सल्ले तुमच्याकडून घेण्याइतक भिकारपण महाराष्ट्राला आलेलं नाही. हिंमत नाही घुसण्याची, बदनाम करताय, कोण तुम्ही? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडाल तर मग शिवसैनिकांना सुध्दा चिडून तुमच्या घरापर्यंत घुसण्याचा अधिकार त्यांना आहे." असे संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यातील परिस्थिती पाहात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल या विषयी बोलतांना राऊतांनी स्पष्ट केलं की, "आम्हाला धमक्या देऊ नका, राष्ट्रपती राजवट लागेल केंद्रिय यंत्रणा येतील अशा धमक्या आम्हाला देऊ नका, हिंमत असेल तर लावा, आम्हाला त्रास द्या." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सध्या शिवसैनिकांवर कोणाचं कंट्रोल नाहीये. दोन दिवसातील घटना या फक्त शिवसेनेच्या भावनेचा उद्रेक नाही, तर जनतेच्या भावनेचा स्फोट आहे"
"तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला देखील घरे आहेत हे लक्षात घ्या. आम्हाला आमच्या घराच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही, शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे नक्की आमचे हात बांधले आहेत." असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
केंद्रीय यंत्रणांच्या बळावर तुमची जी झुंडशाही सुरू आहे त्याला शिवसैनिकांनी झुंडशाहीनं उत्तर दिलं, तर तुम्हाला मिरच्या का झोंबतायत, तुम्ही हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर तो शिवसैनिक आहे आणि हा महाराष्ट्र आहे, तो स्वस्थ बसणार नाही. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेना हीच एक पावर आहे असे देखील राऊत म्हाणाले. बायकाच्या अडून हे शिखंडीचे उद्योग भाजप करत आहे, ते बंद करा असे देखील राऊत यांना भाजपला बजावलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.