shivsena sanjay raut on slam devendra fadnvis bjp pm modi amit shah over morning swearing in ceremony  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis: "फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य, दोन दिल्लीत बसलेत अन्…"

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis News: राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेला पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट नुकतेचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

यावरून राष्ट्रवादी-भाजपत जुंपली आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

फडणवीस जगातंलं दहावं आश्चर्य

अलिकडे त्यांची (भाजप) वक्तव्य पाहतोय देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. जगात आधीची सात आश्चर्य आहेत आणि दिल्लीत दोन आश्चर्य बसलेली आहेत आणि हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलं आहे अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे.

आता गळा काढण्यात काय अर्थ...

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद देण्याचं आपण मान्य केलं होतं. फडणवीस यांनी हॉटेल ब्लू सी मधील स्वतःच वक्तव्य पाहावं.

अमीत शहांसमोरं सत्तेचं वाटप पन्नास-पन्नास टक्के हा त्यांचा शब्द होता. त्यांनी विश्वासघात केल्यावर आता इतर कोणी सत्ता बनवताना विश्वासघात केला म्हणून गळा काढण्यात काय अर्थ आहे" असे राऊत म्हणाले.

"उद्या ते असं बोलतील की सहा महिन्यापर्यंत ४० आमदारांचा सूरत गुवाहाटी गोवा आणि मुंबईत जो शपतविधी झाला तोही शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला असंही ते सांगू शकतात", असेही राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे वैफल्यातून बोलत आहेत, महाराष्ट्रात त्यांच्या सरकारबाबत तिरस्कार आहे.विधानपरिषदेच्या निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला, पुण्याच्या पोटनिवडणूकीत त्यांना दारून पराभव दिसतोय म्हणून ते लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी हे केलं जात असल्याचे संजय राऊत म्हणाले.

"पहाटेच्या शपतविधीच्या आठवणीने फडणवीसांना आजही दचकून जाग येते, याची कारणे शोधून त्यांनी उपचार करून घेतले पाहिजेत" असे राऊत यावेळी म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले...

पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकतंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT