Uddhav Thackeray VS Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: शिवसेना कोणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस; उत्तर देण्यासाठी ८ दिवस बाकी

विधीमंडळ सचिवांनी एकनाथ शिंदे- उध्दव ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक काही दिवसांपुर्वी समोर आलं आहे. आता शिवसेना कोणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचे दिसून येत आहे. शिवसेना कोणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा, असे म्हणत विधीमंडळ सचिवांनी एकनाथ शिंदे- उध्दव ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे.

१३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा युक्तिवाद चालणार आहे. अशात पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांकडे फक्त एका आठवड्याची मुदत शिल्लक राहिली आहे.

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची ही संधी असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे या दोन्ही गटांसह राज्याचं लक्ष लागलं आहे. शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत शिल्लक आहे.

दरम्यान या संपुर्ण प्रकरणावर बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे त्यांच्या कार्यपद्धती वर संशय घ्यायची गरज नाही, असं राहुल नार्वेकर म्हणालेत तर कायदा पाळून सगळे निर्णय घेतील जातील. संविधानिक शिस्त पाळली जाईल, सभागृहाच्या बाहेरून होणाऱ्या आरोपामुळे कधीच प्रभावित होत नाही आणि माझ्या निर्णयावर काही त्याचा फरक होणार नाही, असंही नार्वेकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

IND A vs AFG A : अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना बदड बदड बदडले... ट्वेंटी-२०त दोनशेपार पोहोचले

IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला

MNS Candidates List: एकेकाळी विश्वासू सहकारी असलेल्या धंगेकरांविरोधात राज ठाकरेंनी दिला 'हा' उमेदवार

Latest Maharashtra News Updates Live : पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करणार- सुधीर साळवी

SCROLL FOR NEXT