Shivsena UBT Sanjay Raut Slam CM Shinde Ajit Pawar Over Photo with Criminals asif dadhi Dipak Sapke hemant dabhekar  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : 'गुंड दरोडेखोरांनी ढापलं सरकार'; ठाकरे गटाकडून थेट फोटो छापत CM शिंदे, अजित पवारांवर जहरी टीका

Maharashtra Politics Latest News : भाजप आमदारर गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचं प्रकरण चांगलच पेटलं आहे.

रोहित कणसे

Maharashtra Politics Latest News : भाजप आमदारर गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केल्याचं प्रकरण चांगलच पेटलं आहे. या घटनेनंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यादरम्यान विरोधकांकडून एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर हल्ला चढवण्यात येत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर सामनातून जहरी टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छोटा राजन टोळीतील शार्पशूटर दरोडेखोर दिपक सपकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नाहीतर सामनाच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यासोबत दिपक सपकेंचा फोटो देखील छापण्यात आला आहे.

तर सिमीशी कनेक्शन असलेला गुन्हेगार आसीफ दाढी याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा फोटोही सामनातून छापत टीका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदेच्या वाढ दिवासानिमित्त पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर हा वर्षा बंगल्यावर शुभेच्छा देतानाचा फोटो देखील देण्यात आला आहे.

अर्थात या घटनेची गंभीर दखल घेत श्रीकांत शिंदेंनी दाभेकर यांना भेटीस आणल्याप्रकरणी युवा सेनेच्या अनिकेत जावळकर याची पदावरून हकालपटी केली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात गुंडाराज आणू इश्चितात असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सामनातून मिंद्याचं जंगलराज गुंड, दरोडेखोरांनी ढापलं सरकार या आशेयाखाली बातमी छापलयाने राजकिय चर्चा रंगू लागल्या आहेत.

संजय राऊतांची पुन्हा पोस्ट

"महाराष्ट्रात गुंडा राज: गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.." अशी पोस्ट करत संजय राऊत यांनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये एक फोटो हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निलेश घायवळ उभा असल्याचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT